काही शहरांची विशेष ओळख असते. वाढत्या नागरीकरणामुळे त्यांचं सौंदर्य टिकवण ही मोठी जबाबदारी ठरते. लोणावळासारखं पर्यटकांचं आकर्षण केंद्र असेल तर मग ती जबाबदारी आणखीनच वाढते. लाखो पर्यटकांचा ओढा असलेल्या लोणावळा नगरपरिषदेने राबवलेली स्वच्छता मोहीम आणि केलेले कचरा निर्मूलन शहराच्या किर्तीत आणखी भर घालत आहे.